प्रस्तावित कृषी कायद्यांना कृषी विक्रेते संघटनांचा विरोध

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य सरकारच्या प्रस्ताविक कृषी कायद्यांना कृषी विक्रेत्यांनी विरोध केला असून याच्या अंतर्गत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह कृषी मंत्र्यांना पोस्ट कार्ड लिहून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

राज्य सरकार तर्फे पावसाळी अधिवेशनात कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी घोषित केलेल्या व पुढील अधिवेशनात प्रस्तावित असलेल्या कृषी कायद्यांमध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी सारखा प्रकार आहे. याच्या अंतर्गत एमपीडीए सारख्या झोपडपट्टी गुंड म्हणून त्यात असलेले गुन्हे नोंद होणार असल्याने कृषी विक्रेत्यांनी या कायद्यास प्रचंड विरोध दर्शविला आहे.

त्या अनुषंगाने मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना.अजित पवार,ना.देवेंद्र फडणवीस,कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांना राज्यभरातून पोस्ट कार्ड पाठवून विरोध दर्शवण्यााठी रावेर तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशन तर्फे माफदा,पुणे चे राज्य अध्यक्ष विनोद तराळ यांच्या उपस्थितीत पोस्ट कार्ड लिहून तालुक्यातील कृषी विक्रेते बांधवांनी विरोध दर्शविला.

या कायद्यांना विरोध करण्यासाठी पोस्ट कार्ड मोहिमेनंतर तीन दिवसीय बंद पुकारण्यात येणार असल्याची माहिती विनोद तराळ यांनी दिली. हिवाळी अधिवेशना पूर्वी या कायद्यांबाबत कृषी विक्रेत्यांचे हित लक्षात न घेता कायदा होत असल्यास हिवाळी अधिवेशना वेळी राज्यभरातून सर्व ५० ते ७० हजार कृषी विक्रेते बांधव नागपूर येथे ठिय्या आंदोलन करतील असे माफदा संघटनेच्या वतीने विनोद तराळ यांनी सांगितले.

यावेळी रावेर कृषी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे,सचिव युवराज महाजन,चंद्रकांत अग्रवाल,राहुल पाटील,डॉ जी एम बोंडे,एकनाथ महाजन,भागवत पाटील,भगवान महाजन,राजू प्रजापती,गिरीश ढाके,रवींद्र बारी,प्रदीप महाजन,मयूर कोंडे,सुधाकर चौधरी,जितेंद्र महाजन, यादवेंद्र महाजन,वैभव चौधरी,कृष्णा पाटील,संजय महाजन यांसह आदी विक्रेते उपस्थित होते.

Protected Content