Home Cities भुसावळ भुसावळात नवीन बस स्टँडच्या कंपाऊंडचे भूमिपुजन ( व्हिडीओ )

भुसावळात नवीन बस स्टँडच्या कंपाऊंडचे भूमिपुजन ( व्हिडीओ )

0
108

new bus stand bhusawal

भुसावळ प्रतिनिधी । येथील नाहाटा कॉलेजसमोर उभारण्यात येणार्‍या नवीन बस स्थानकाच्या कंपाऊंडचे भूमिपुजन आज आ. संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले.

भुसावळ शहरातील बस स्थानकाची जागा ही रेल्वेच्या मालकीची असून येथे शहराचा वाढता विस्तार आणि बसेसची वाढती संख्या लक्षात घेऊन अनेक अडचणी येत आहेत. या अनुषंगाने नाहाटा कॉलेजच्या समोर बस स्थानकाला मंजुरी मिळाली आहे. या स्थानकाच्या वॉल कंपाऊंडच्या कामाचे भूमिपुजन आज आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, ज्येष्ठ नगरसेवक युवराज लोणारी, विजय मोतीराम चौधरी, बोधराज चौधरी, पिंटू कोठारी, महेंद्रसिंग ठाकूर, राजू नाटकर, प्रा. प्रशांत पाटील, पुरूषोत्तम नेमाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी माहिती देतांना आमदार संजय सावकारे म्हणाले की, सुमारे दोन महिन्यात बस स्थानकाच्या वॉल कंपाऊंडचे काम पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात येथे तात्पुरते शेड आणि महिलांसाठी टॉयलेट उभारण्यात येणार आहे. प्रारंभी येथे फक्त लांब पल्ल्याच्या बसेस थांबणार आहेत. तर जिल्ह्यातील बसेस या सध्या असणार्‍या बस स्थानकावरूनच जातील. मात्र येत्या काही महिन्यांमध्ये येथे पूर्णपणे बस स्थानक शिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सावकारे यांनी दिली.

पहा : उदघाटनासह आमदार संजय सावकारे यांनी दिलेल्या माहितीचा व्हिडीओ.


Protected Content

Play sound