जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्त्याने पायी जात असलेल्या प्रौढाला राँग साईडने येणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जखमीने दिलेल्या तक्रारीवरुन दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील तुकाराम वाडी परिसरात सुनिल भिका महाजन हे वास्तव्या असून ते खासगी नोकरी करुन आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. दि. ६ रोजी सायंकाळच्या सुमारास शहरातील अजिंठा चौफुलीजवळील हॉटेल निलांबरीजवळून पायी जात होते. यावेळी समोरुन (एमएच १९ डीडबल्यू १७७१) क्रमांकावरील दुचाकीस्वार राँग साईडने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत जात होता. यावेळी दुचाकीस्वाराने पायी जात असलेल्या प्रौढाला दुचाकीची जोरदार धडक दिली. या अपघाात पादचारी गंभीर जखमी झाले, उपचार घेतल्यानंतर जखमी सुनिल महाजन यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दुचाकीस्वाराविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.