जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वावडदा येथून दुचाकीने घरी जात असतांना कारने जोरदार धडक दिल्याने म्हसावद येथील ३२ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी शनिवारी ९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील रहिवाशी दिपक बाविस्कर हा आईवडील, पत्नी व तीन वर्षाच्या मुलीसह वास्तव्याला होते. दिपक बाविस्कर हा कामाच्या निमित्ताने दुचाकीने वावडदा येथे गेला होता. काम आटोपून मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास परत घरी येत असतांना वावडदा ते म्हसावद दरम्यान असलेल्या कुरकुरे नाल्याजवळून जात असतांना कार क्रमांक (एमएच १९ ईए ०००२ ) ने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दिपकचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार काही वाहनधारकांच्या लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने खासगी वाहनाने जिल्हा शासकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी शनिवारी ९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अमोल मोरे करीत आहे.