धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सराफ बाजार गल्लीतील कापड दुकान फोडून अज्ञात दोन चोरट्यांनी गल्ल्यातून २० हजारांची रोकड लांबविल्याची घटना सोमवारी ४ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजून ५८ मिनीटांनी चोरून नेल्याचे समोर आले. चोरी करतांना दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, भिका सुरेश बडगुजर (वय-६७) रा. बडगुजर गल्ली, धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सराफ बाजार गल्लीतील मिश्रीलाल लालचंद कापड दुकानात कामाला आहे. सोमवारी ४ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजून ५८ मिनीटांनी अज्ञात चोरट्यांनी कापड दुकान फोडून आत प्रवेश करत गल्ल्यातील २० हजारांची रोकड चोरून नेल्याचे समोर आले आहे. पैशांची चोरी करतांना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर भिका बडगुजर यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ पवार करीत आहे.