Home राजकीय “शासन आपल्या दारी” कार्यक्रमस्थळाची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पाहणी

“शासन आपल्या दारी” कार्यक्रमस्थळाची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पाहणी


बुलढाणा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । “शासन आपल्या दारी” या शासनाचा लोकाभिमुख कार्यक्रमात बुलढाण्यात पार पडत आहे. सकाळी साडेअकरा वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुलढाण्यात या कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत. या कार्यक्रमाची बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी सभास्थळी जाऊ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून कार्यक्रमाची पाहणी केली.

 

कार्यक्रमाचे नियोजन व मुख्यमंत्री महोदय यांचा दौरा याबाबत प्रशासनाने तयारी केली असून कडक पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे. दोन दिवसांपूर्वी जालना येथे झालेल्या घटनेवरून प्रशासन सज्ज असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व खबरदारी घेतल्या जात आहे.


Protected Content

Play sound