शिखर परिषदेत पाकिस्तानी पंतप्रधानाचे असभ्य वर्तन

imran khan breaks protocol

बिश्केक (वृत्तसंस्था) पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याने बिश्केकमधील शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पुन्हा एकदा शिष्टाचाराला हरताळ फासला. या बैठकीत इतर देशांचे राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान बैठकीत येत असताना इम्रान खान मात्र न उठता आपल्या जागेवरच बसून राहिला. शिष्टाचाराचे उल्लंघन करतानाचा इम्रान खान यांचा बैठकीतील हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 

बिश्केकमधील शिखर परिषदेतील पंतप्रधान इम्रान खान यांचा हा व्हिडिओ पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफच्या (पीटीआय) अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला. यात राष्ट्रप्रमुखांचे बैठकीत आगमन होत असताना उपस्थित राष्ट्रप्रमुख उभे राहून येणाऱ्या राष्ट्रप्रमुखांचे टाळ्या वाजवून स्वागत करताना दिसत आहेत. इम्रान खान मात्र आपल्या जागेवरच बसून असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. बसलेले असताना इम्रान खान एकदा उठून स्वागत करतानाही दिसत आहे. मात्र मध्येच ते काही सेकंदांसाठी उठल्यानंतर त्यांनी नंतर कायमचीच बैठक मारली. त्या वेळी इतर देशांचे पंतप्रधान वा राष्ट्रप्रमुख मात्र उभे राहून इतरांचे टाळ्यांनी स्वागत करताना व्हि़डिओत दिसत आहेत.

Protected Content