जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी।राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हा बैठक उद्या दि. २६ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत खा. पवार यांच्या दौऱ्याच्या नियोजनासोबतच प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सूचनेनुसार नवीन जिल्हा कार्यकारीणी तसेच नवीन तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष निवडीवरही चर्चा होईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
तरी या बैठकीला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील युवक कार्यकर्त्यांनी बैठकीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन युवक चे ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केले आहे.