दिव्यांग बांधवांसाठीची टोकन पध्दत बंद करा- प्रहार जनशक्ती पार्टीची मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।   दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र काढण्यासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू असलेली टोकन पद्धत तातडीने बंद करावी, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाला मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांग बांधवांना त्यांना मूलभूत सुविधा सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाकडून नुकतेच स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची घोषणा करण्यात आलेली आहे. असे असतांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दर बुधवारी दिव्यांग बांधवांसाठी शिबिर घेण्यात येते. या शिबिरासाठी टोकन पद्धत लागू करण्यात आलेले आहे. प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातून दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतात, या ठिकाणी दिव्यांग बांधवांना कोणत्याही सुविधा मिळत नाही, केस पेपर काढण्यासाठी देखील त्यांना सर्वसामान्य लाईनमध्ये उभे राहावे लागते, त्यानंतर त्यांना टोकन देऊन परत चार ते पाच महिने पुन्हा थांबावे लागते. यामुळे दिव्यांग बांधवांचे मोठे हाल होत आहे, अशी परिस्थिती राज्यात कुठेही नाही. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मात्र हा प्रकार सुरू असल्याने सर्वत्र नाराजी पसरलेली आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र देण्यासाठी ठरलेला वार असलेल्या दिवशीच टोकन न देता तपासणी करण्यात यावी तसेच दिव्यांग बांधवांना कुठलेही गैरसोय होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार २५ ऑगस्ट रोजी दुपारी मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष संभाजी सोनवणे, जिल्हा युवक अध्यक्ष दिनेश कोळी, महानगराध्यक्ष प्रवीण पाटील, नीता राणे, पंकज पवार, जतीन पांड्या, विजय पाटील, नरेंद्र सपकाळे, नितीन सूर्यवंशी, युसूफ खान, अजय बनसोडे, रोहित कोठावदे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content