जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील शरीर विकृतीशास्त्र (पॅथॉलॉजी) या विभागात टिशू प्रोसेसर आणि मायक्रोटॉम या दोन मशीन नविन उपलब्ध झाले आहेत. त्याची सुरुवात अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे रुग्णांना या मशीनमुळे मोठा फायदा होणार आहे.
विविध आजारांचे निदान करण्यासाठी टिशू बायोप्सी केली जाते आणि त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून निदान केले जाते. त्यानुसार पुढील उपचार केले जातात. त्यामुळे रुग्णसेवा ही सुरळीत राहण्यास मदत होते, अशी माहिती प्रस्तावनेमधून विकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दीपक शेजवळ यांनी दिली. प्रसंगी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते.
आवश्यक असणाऱ्या सामुग्री मिळाल्यामुळे त्याचा आता रुग्णसेवेसाठी अधिकाधिक लाभ कसा घेता येईल या दृष्टीने विभाग प्रमुखांनी प्रयत्न करावे असे यावेळी अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी सांगितले. प्रसंगी सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. विकृतीशास्त्र विभागातील सहयोगी प्रा. डॉ. शुभांगी आगळे, डॉ. निलेश पाटील, डॉ. कुणाल देवरे, डॉ. भरत बोरोले यांच्यासह डॉ. श्यामली नावडे, प्रेरणा गायकवाड, नताशा पटेल, नम्रता वाघ, श्रद्धा पैठणकर, अश्विनी तायडे, तंत्रज्ञ सुनील खैरनार, विजय बागुल आदींनी उपक्रमासाठी सहकार्य केले.