विद्यापीठातील उच्च संशोधन उपकरणे हाताळणे कार्यशाळेचा समारोप

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे यांच्यावतीने ७ ते  १२ ऑगस्ट या कालावधीत उच्च संशोधन उपकरणे हाताळण्याबाबतच्या झालेल्या कार्यशाळेचा समारोप झाला.

 

हा समारोप प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कार्यक्रम समन्वयक प्रा. ए. एम. महाजन व अध्यापक विकास संस्थेचे समन्वयक सुरज बाबर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या एक आठवड्याच्या अध्यापक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सर्व प्रशिक्षणार्थींना विद्यापीठातील विविध प्रशाळांमधील नाविण्यपूर्ण् व अद्ययावत प्रयोगशाळांना भेटी देऊन प्रत्यक्ष उपकरणे हाताळण्याची संधी देण्यात आली.

 

त्यात भौतिकशास्त्र प्रशाळेतील प्रा. ए. एम. महाजन यांनी सेमीकंडक्टर डिव्हायसेस/उपकरणांच्या फॅब्रीकेशनसाठीची क्लास १०००० क्लीन रूमचे प्रशिक्षण दिले, प्रा. डी. जे. शिराळे यांनी नॅनो-सेन्सर्ससाठी नॅनो-स्ट्रक्चर्ड साहित्य आणि बायो-सेन्सर्स प्रयोगशाळा व प्रा. एस. एस. घोष यांनी सोलार सेलसाठी उपयुक्त अशा ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स प्रयोगशाळांची माहिती दिली, रसायनशास्त्र प्रशाळेतील प्रा. व्ही. व्ही. गिते यांनी पॉलिमर आणि रबर प्रक्रिया चाचणी व प्रा. आर. एस. बेंद्रे यांनी किटकनाशक निर्मिती प्रयोगशाळा, रासायनिक तंत्रज्ञान संस्थेतील प्रा. देशपांडे व प्रा. विकास पाटील  यांनी अत्याधुनिक उपकरण केंद्र व प्रक्रिया आणि वैशिष्ट्यकरण या प्रयोगशाळांबद्दल माहिती देऊन प्रत्यक्ष सादरीकरण केले. तसेच गणित विभागातील प्रा. आर. एल. शिंदे व प्रा. के. के. कमळजा यांनी मिनी टॅब सॉफ्टवेअर व संगणक विभागातील प्रा. स्नेहलता शिरूडे यांनी संशोधनासाठीच्या काही उपयुक्त सॉफ्टवेअर साधनांची माहिती दिली. जीवशास्त्र प्रशाळेतील प्रा. भूषण चौधरी यांनी एचपीएलसी, प्रा. विश्वकर्मा यांनी टिश्यु कल्चर व हरितगृह  आणि प्रा. नवीन दंदी यांनी गॅस क्रोमटोग्राफीबद्दल प्रशिक्षण दिले. तसेच मा. प्र-कुलगुरू महोदयांनी पर्यावरण व पृथ्वी विज्ञान प्रशाळेची माहिती दिली. प्रा. एस. एन. पाटील व प्रा. अत्तरदे यांनी भौगोलिक संग्रहालय व हवा गुणवत्ता निरीक्षण प्रणालीबद्दल प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले.

 

एकुणच विद्यापीठातील विविध प्रशाळांमध्ये उपलब्ध असलेले वैशिष्ट्यपूर्ण उपकरणे जसे पीईएएलडी सिस्टम, मॉस प्रक्रिया सेटअप, सोलार सेल आणि ओलेड सेटअप, एक्सआरडी, एएफएम, रमण, रेहोमीटर, जीसी, एचपीएलसी इत्यादी हाताळण्याची संधी प्रशिक्षणार्थींना मिळाली. सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींना या प्रशिक्षण शिबिरातून नाविन्यपूर्ण माहिती, अद्यायावत उपकरणे हातळण्याची संधी व माहिती मिळाल्यामूळे आपापल्या महाविद्यालयात संशोधन करण्यास प्रवृत्त झाल्याचे मत व्यक्त केले. या प्रशिक्षणात महाराष्ट्र राज्यातील विविध १३ जिल्ह्यातील ३५ अध्यापक व संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते.

Protected Content