


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी १३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरोजखान अय्युब खान (वय-४५) रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी १२ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ सीक्यू ४९३१) घरासमोरील मोकळ्या जागेत पार्कींगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे रविवारी १३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता उघडकीला आली. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.



