मोहम्मद नगरातून एका तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील खडका रोड परिसरातील मोहम्मद नगरातून एका तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी १३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक असे की, कादर सिकंदर तडवी रा. मोहम्मद नगर, खडका रोड, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. १२ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता त्यांनी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीजी ९३४७) हे घरासमोर पार्कींगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेल्याचे रविवारी १३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकीची कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर रात्री ११ वाजता त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक अर्चना अहिरे करीत आहे.

Protected Content