पत्रकारावर हल्ला करणार्‍यांवर कठोर कारवाई करा : जामनेरात निवेदन

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर हल्ला करणार्‍या आरोपीवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज जामनेर मराठी पत्रकार संघ व ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

 

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर करण्यात आलेला भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जामनेर तालुका मराठी पत्रकार संघ , पत्रकार मंच, ग्रामीण पत्रकार संघ या संघटनेच्या वतीने आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना लेखी निवेदन देण्यात आले .

 

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना पाचोरा आमदार किशोर पाटील यांनी अश्लील शिवीगाळ व धमकी दिल्याची घटना घडल्यानंतर संदीप महाजन यांना  मारहाण केल्याची घटना घडली आहे.  यामुळे अशा प्रकारे पत्रकार यांच्यावर हल्ले करणार्‍या आरोपीची चौकशी करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

 

निवेदन देताना पत्रकार भानुदास चव्हाण, प्रल्हाद सोनवणे, प्रदीप गायके, राहुल इंगळे, सुहास चौधरी, लियाकत अली सय्यद, सुरेश महाजन, किरण सोनवणे, प्रकाश सैतवाल, रवींद्र झाल्टे, अमोल महाजन, संजय सूर्यवंशी, सुनील नेरकर, सागर लव्हाळे, राहुल इंगळ,े पंढरी पाटील, विलास ठाकरे, मीनल चौधरी, मीना शिंद,े प्रीती कुमावत, गजानन तायडे, शांताराम झाल्टे, नितीन इंगळे, मच्छिंद्र इंगळे यांच्यासह जामनेर तालुका शहर व तालुक्यातील पत्रकार यावेळी उपस्थित होते.

Protected Content