मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह असोसिएशनचे निदर्शने

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी नितीच्या निषेधार्थ जळगाव येथील महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह असोसिएशन अर्थात MSMRA या संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी ९ ऑगस्ट रोजी १२ वाजून ५० मिनीटांनी निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रलंबित मागण्यांचे निवेदन असोसिएशनच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र व राज्य सरकारने पारित केलेला कामगार विरोधी व श्रम संहिता रद्द करा, विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियमन करावे,  विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांना विक्री करण्याचे लक्ष रद्द करण्यात यावे,  कामागारांना किमान वेतन २६ हजार लागू करण्यात यावा, सर्व कामगारांना दहा हजार रूपये मासिक पेन्शन देण्यात यावी,  औषधांची ऑनलाईन विक्री बंद करा, औषध निर्माण क्षेत्रातील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी विपणन वैधानिक संहिता करा आदी मागण्या मांडण्यात आल्या. शासकीय व निमशासकीय अस्थापनांमध्ये कंत्राटी,  रोजंदारी व हंगामी पध्दतीने काम करणाऱ्या कामागारांना कायम करावे यासह आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आसोशिएशनचे  सचिव संदीप पाटील , चेतन पाटील, चंपालाल पाटील, अजहर शेख, सागार घटक, अमोल कुळकर्णी, गिरीश नारखेडे, मनिष चौधरी, महेश चौधरी, विशाल चौधरी, विजय चौधरी, दिनेश शिंपी, नितीन पाटील, राजेश पोद्दार, सचिन चौधरी यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content