शेंदूर्णीत उद्या लसीकरण शिबीर

शेंदूर्णी प्रतिनिधी । येथिल नगरपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदूर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (दि.४) सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे येथील पारस मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.

नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. लसीकरणास स्वतःचे आधार कार्ड व मोबाईल सोबत आणावा असे आवाहन नगराध्यक्ष विजया खलसे, उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल, मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी केले आहे. या शिबिरात २ हजार नागरिकांना लस देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

 

Protected Content