खेडी गावातील पाटीलवाडा येथून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव तालुक्यातील खेडी गावातील पाटीलवाडा येथून एका तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात चोरट्यांवर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गजानन रतन पाटील (वय-३६, रा. पाटीलवाडा खेडी ता. जि.जळगाव) हा तरुण मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. ४ ऑगस्ट रात्री ९ ते ५ ऑगस्ट सकाळी ७ वाजेच्या दरम्यान गजानन पाटील यांनी त्याची दुचाकी (एमएच १९ एन ५५४४) घरासमोर पार्क करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने हे दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गजानन पाटील यांनी परिसरात सर्वत्र दुचाकीच्या शोध घेतला. परंतु दुचाकी मिळाली नाही, अखेर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश शिरसाळे करीत आहे.

Protected Content