पैशांच्या वादात शोरूम मालकासह पुत्रावर विनयभंगाचा गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । ग्राहकाकडून इन्शुरन्सच्या कामाकरीता ३० हजार रूपये घेतल्याचा आरोप करत महिलेला अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी सरस्वती फोर्ड शोरूमचे मालक व व्यवस्थापकावर नशिराबाद पोलीस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेच्या फिर्यादीत म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ नशिराबाद रोडवरील सरस्वती फोर्ड शोरूमध्ये शहरातील ३४ वर्षीय महिला तेथे कामाला आहे. तेथे इन्शरन्सचे काम पाहतात. दरम्यान २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शोरूमचे मालक मुकेश टेकवाणी आणि त्यांचा मुलगा धवल मुकेश टेकवाणी यांनी महिलेवर ग्राहकाकडून इन्शुरन्सच्या कामाकरीता ३० हजार रूपये घेतल्याचा खोटा आरोप केला. आरोप केल्याचा खुलासा करण्यासाठी शोरूमवर गेली असता मुकेश टेकवाणी आणि धवल टेकवाणी यांनी महिलेला पोलीसांचा धाक दाखवत लज्जा उत्पन्न होईल असे अश्लिल शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच पोलीसांचा धाक दाखवून माफिनामा लिहून, न घेतलेले ३० हजार रूपये वसुल केले. याप्रकरणी महिलेने नाशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेतली. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात शोरूमचे मालक मुकेश टेकवाणी आणि त्यांचा मुलगा धवल मुकेश टेकवाणी यांच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंखे करीत आहे.

Protected Content