फैजपुरात डॉ. उल्हास पाटील कॉलेजच्या कृषी कन्यांचे स्वागत !

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉॅ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थीने फैजपुर शिवारात प्रॅक्टीकल अध्ययन करणार असून या विद्यार्थीनींचे जोरदार स्वागत करण्यात आले.

 

डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय,जळगाव येथील अंतिम वर्षातील विद्यार्थीनी पुढील चार महिन्यांसाठी फैजपूर या गावात राहणार आहेत. त्यांनी शेतकर्‍यांना माती परीक्षण, एकात्मिक कीड नियंत्रण, रोग नियंत्रण, भाजीपाला लागवड, फळबाग लागवड नियंत्रण, शासनाच्या विविध योजना, तसेच महिला बचत गट, इ पीक पाहणी अँप इ. प्रकारच्या सर्व माहिती व नवीन तंत्रज्ञान  कसे आत्मसात करावे या विविध विषयी माहिती देण्यासाठी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२३ – २०२४ घेण्यात आला.

 

यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. ए. देशमुख व संबंधित विषयातील विषय विशेष तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रिया बडे, सुजाता खरात, वैष्णवी गुंजकर, वैशाली रोडे या कृषी कन्या फैजपूर गावात दाखल झाल्या आहेत. नगर परिषद फैजपूर व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने या विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले. यावेळी गावच्या सह. कार्यालय अधिक्षक श्रीमती संगिता बाक्षे व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. हा  उपक्रम गावकर्‍यांच्या  उपस्थितीत पार पडला.

Protected Content