जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहमध्ये तज्ज्ञांनी मातेने आपल्या बाळास कशाप्रकारे स्तनपान करावे व ते का महत्त्वाचे आहे हे समजून सांगितले. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या उदाहरणातून मातांचे मार्गदर्शन केले.
अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हातून फित कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयातील नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी एक कविता सादर करून त्यात कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी या बाळासाठी महत्त्वाच्या आहे व त्याला कोणत्या प्रकारे स्तनपान केले पाहिजे हे थोडक्यात सांगितले. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्लोगनचा वापर करण्यात आला. बाळ, आईचे पोस्टर आणि जागतिक स्तनपान सप्ताह याची सुंदर अशी रांगोळी विद्यार्थ्यांनी काढली होती. कार्यक्रमाच्या शेवटी मातांना पौष्टिक आहार यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जितेंद्र घुमरे, डॉ. बाळासाहेब सुरोशे, अधिसेविका प्रणिता गायकवाड, प्राचार्य अनिता भालेराव, आशा चिखलकर, अर्चना भास्कर, परिचारिका लता सावळे, सुवर्णा कागणे तसेच नर्सिंग ट्रेनिंग कॉलेजचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.