अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मुडी-बोदर्डे येथील शेतकर्याच्या सुमारे तीन बिघे शेतीतील कपाशी समाजकंटकाने उपटून फेकल्याने परिसरात खळबळ उडाली असून या शेतकर्याला शासकीय मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील मुडी बोदर्डे येथिल शेतकरी देविदास पाटिल यांच्या शेतातील काही समाज कंटकांनी त्यांच्या तीन बिघे शेतात कापसाचे दोनशे ते तीनशे झाडे उपटुन फेकले आहेत. यामुळे या शेतकर्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. या बाबत शेतकरी देविदास पाटिल यांनी मारवड पोलिस स्टेशनाला तक्रार दिली आहे.परंतू शेतात अद्यापही कोणतेही शासकिय अधिकारी पंचनामासाठी पोहचलेले नाहीत. या घटनेमुळे परिसरातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला आहे.
दरम्यान, देविदास पाटील यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने या नुकसानीचा शासकीय पंचनामा करून त्यांना तात्काळ राज्य शासनातर्फे मदत मिळावी अशी मागणी परिसरातून करण्यात येत आहे.