Home Cities अमळनेर भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष पदी भैरवी वाघ-पलांडे : संघटनेत मिळाले प्रमोशन

भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष पदी भैरवी वाघ-पलांडे : संघटनेत मिळाले प्रमोशन


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी जिल्हा दूध संघाच्या माजी संचालिका सौ. भैरवी वाघ-पलांडे यांची कामाची पावती म्हणून बढती करत प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड केली आहे. या माध्यमातून त्यांना पदोन्नती मिळाली आहे.

 

आर्किटेक्ट भैरवी वाघ-पलांडे यांनी महाविद्यालयीन काळात जळगाव येथे अभाविपच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळीत सक्रीय सहभाग घेतला आहे. भारतीय जनता युवा मोर्चामधील महत्त्वपूर्ण कार्यामुळे त्यांच्याकडे पुणे महानगर उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती.त्यानंतर त्यांच्यावर प्रदेश सचिव म्हणून जवाबदारी देण्यात आली होती.पक्ष संघटनेत त्यांची कारकीर्द अधिकच उज्वल राहिल्याने त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मोठी जवाबदारी देण्यात आली आहे.

 

भैरवी या माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ व स्व.उदय वाघ यांच्या कन्या असून पुणे येथील सौ. जयश्री व ऍड अशोकराव पलांडे यांच्या स्नूषा आहेत. भैरवी अपूर्व पलांडे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,जळगांव खासदार उन्मेष पाटील,रावेर खासदार रक्षाताई खडसे, जळगांव आमदार राजूमामा भोळे, चाळीसगाव आमदार मंगेश चव्हाण, भुसावळ आमदार संजय सावकारे,विभाग संघटन मंत्री रवि अनासपुरे,जळगांव जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज, रावेर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, महानगराध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


Protected Content

Play sound