यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील विद्यालयात महसूल सप्ताह दिना निमित्ताने साकळी विभागाचे मंडळाधिकारी सचिन जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला तलाठी मधुराज पाटील यांच्यासह साकाळीचे मंडळ अधिकारी सचिन जगताप यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना महसूल विभागातील विविध शासकीय योजना बाबतीत माहिती देवुन मार्गदर्शन केले. नवतरुण विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना महसूल विभाग व आपला अभ्यास या बाबतीत असलेला संभ्रम दूर केला. त्यांनी विद्यार्थ्याशी हितगुज घालतांना येणाऱ्या कार्यकाळात अभ्यासात अग्रेसर राहून स्पर्धा परीक्षेत ही सहभागी होण्याचा सल्ला दिला.
महसूल दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शासन आपल्याला दारीं या अभियाना अंतर्गत जातींचे दाखले, उत्पन्न दाखले, डोमेसीयल, नॅशनलिटी, साठी काही अडथळे येत असतील तर त्यांनी तलाठी यांच्याशी संपर्क साधावा, जेणे करून आपण शाळेतच विद्यार्थ्यांना दाखले देण्याचा प्रयन्त करणार असल्याचे आश्वासनही सचिन जगताप यांनी दिले. तसेंच ‘माझा पिक पेरा मीच नोंदविणार’ या संकल्पनेतून ई-पीक नोंदणी कशी करावी, या बाबतीत मार्गदर्शन केले. जेणे करून आपल्याला शेतकरी वडिलांना विद्यार्थी समजावू शकेल व प्रत्येक शेतकरी आपला पेरा नोंदणी करू शकेल असे अचूक मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आले.
या प्रसंगी विद्यार्थ्याशी चर्चा करीत त्यांच्यातील अभ्यासू वृत्तीचा व त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना २ ते ३०० पर्यंतचे टेबल कुणाचे पाठांतर आहे का? असे विचारले असता स्नेहल नेवे या विद्यार्थिनीने आपला हात उंचावला व जगताप यांनी १९ व २७ चा टेबल म्हणून दाखवण्यासाठी विचारले असता स्नेहल मनोज नेवे इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी ने दोघ टेबल (पाढा) तोंडी म्हटल्याने ५०१ रुपयांचे बक्षीस देत विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत प्रोत्साहीत व प्रेरित केले. तसेच सातबारा म्हणजे का ?याचे महत्व काय हे सांगणाऱ्या इत्तया ९ वी ची विद्यार्थीनी कु.गायत्री सोळंके हिला १०१ रूपयांचे द्वितीय बक्षीस मंडळधिकारी सचिन जगताप यांनी घेतलेल्या या महसुल दिनाच्या कार्यक्रमा निमित्ताने संपन्न झालेल्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना महसुल विभाग व महसुल अधिकारी या दोघांचे महत्व काय ते शिकायला मिळाले.
या प्रसगी शाळेचे मुख्यध्यापक उमाकांत महाजन यांनी मंडळधिकारी सचिन जगताप व तलाठी मधुराज पाटील यांच्या कार्यप्रणालीचे विशेष कौत्तुक केले . या कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणी विद्यार्थी मोठया संख्येत उपस्थित होते .