पद्मश्री ना.धों.महानोर यांना जळगावकरांनी वाहिली श्रद्धांजली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राचे प्रसिद्ध निसर्गकवी, प्रगतिशील शेतकरी  म्हणून ओळख असलेले जेष्ठ कवी पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित ना.धों.महानोर यांचे वयाच्या ८१व्या वर्षी दीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले. युवाशक्ती फाऊंडेशनच्या वतीने पद्मश्री ना.धों.महानोर यांना  काव्यरत्नावली चौक येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पद्मश्री ना.धों.महानोर यांच्या रूपाने एका प्रतिभाशाली आणि आपल्या शब्दांनी रसिकांना समृद्ध करणारा कवी आणि भूमिपुत्र हरपला याचे अतीव दुःख आहे. दोन वेळा विधान परिषदेचे आमदार म्हणून त्यांनी काम केले होते, ते पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जात तसेच हायटेक ऍग्री कल्चर शेतीचे ते पुरस्कर्ते होते.

युवाशक्ती फाउंडेशनतर्फे पद्मश्री ना.धों.महानोर यांना काव्यरत्नावली चौक येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी पुष्पांजली वाहून व मेणबत्त्या लावून आदरांजली वाहण्यात आली. पद्मश्री महानोर यांनी लिहलेल्या गीतांनी वातावरण भारावून गेले होते. काही नागरिकांनी अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.

कवी निवृत्ती कोळी, कवियत्री पुष्पलता सी.एय सी.ए. सुभाष लोढा, श्वेता मुले, राजपूत गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विराज कावडीया यांनी केले.

या वेळी युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक कावडीया कावडीया, प्रीतम शिंदे, अस्मिता पाटील, डॉक्टर प्रीत सोनी, प्रा.भास्कर पाटील, विजया महाजन, चंद्रशेखर नेवे, राजेश नाईक, सोमसिंग पाटील, यश राठोड, सुरज परदेशी, ओम पाटील, सागर राठोड, बबन गवळी, संदीप सूर्यवंशी, उमाकांत जाधव, दुर्गेश जाधव आदी जळगावकर उपस्थित होते.

Protected Content