जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘मोदी आडनाव’ बदनामी प्रकरणात २ वर्षांच्या शिक्षेला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयाचे स्वागत करत जळगाव शहरातील काँग्रेस भवनासमोर शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
कर्नाटकातील निवडणूक प्रचाराच्या दरम्यान राहुल गांधी यांनी देशातून फरार झालेले नीरव मोदी व ललित मोदी यांच्याबाबत बोलताना मोदी आडनावावर टिप्पणी केली होती. ‘सर्व मोदी चोर कसे?’ असा उपरोधिक प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यांचा रोख अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांच्याकडे होता. त्यानुसार राहूल गांधी यांच्याविरोधात भाजपाचे पदाधिकारी पुर्णेश मोदी यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता. त्यावर राहूल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेमुळे नियमानुसार त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यानंतर राहूल गांधी यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रिम कोर्टाने राहूल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करत जळगाव जिल्हा काँग्रेस भवनासमोर कॉग्रेस शहराध्यक्ष शामकांत तायडे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी प्रदीप सोनवणे, जाकीर बागवान, सागर सपके, शफी बागवान, जगदीश गाढे, रविंद्र चौधरी, विजय वाणी, सुमन मराठे, गोकुळ चव्हाण, श्रीधर चौधरी, मिनाक्षी जावळे, सुरेंद्र कोल्हे, ताराचंद पाटील, कैलास सोनवणे, मिरा सोनवणे आदी उपस्थित होते.