राहुल गांधींची आदित्य ठाकरेंसोबतही फोनवरून चर्चा

मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत देखील फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

 

उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरे यांनाही फोन केला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय आणि कोरोनाबद्दल चर्चा झाली. राहुल गांधी यांनी कोरोनाचा प्रसार थांबवण्याबरोबर करण्यात येत असलेल्या इतर उपाययोजनांबद्दल आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. मुंबई महानगरातील लोकसंख्या खूप आहे. मुंबईतील वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. मात्र, आपण स्क्रिनिंग आणि टेस्टिंगचे प्रमाण वाढवायला हवे. महाराष्ट्र सरकार सध्या चांगले काम करत आहे, असे राहुल गांधी आदित्य ठाकरे यांना म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, या राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी त्यांनी काँग्रेसला निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले. यानंतर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी बुधवारी संयुक्त पत्रकारपरिषद घेत महाविकासआघाडी भक्कम असल्याचा संदेशही दिला होता.

Protected Content