धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिवप्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी नुकत्याच विदर्भ दौऱ्यात महापुरुषांच्या बाबत आक्षेपार्ह विधान करून समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहे. त्यामुळे संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणीचे निवेदन श्री सावता माळी समाज सुधारणा मंडळाच्या वतीने बुधवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता धरणगाव पोलीस प्रशासनाला दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवप्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी नुकत्याच विदर्भ दौऱ्यात असताना अमरावती येथील एका कार्यक्रमात महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गांधी, राजाराम मोहनराय, साईबाबा आणि भारतातील अनेक थोर समाज सुधारकांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करून विविध समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. यात प्रामुख्याने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विषयी जास्त प्रमाणात आक्षेपार्ह हा विधान केले आहे. त्यामुळे माळी समाजाच्या भावना दुखावल्या आहे. संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी. अशी मागणीचे निवेदन श्री सावता माळी समाज सुधारणा मंडळाच्या वतीने बुधवार २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. याप्रसंगी अध्यक्ष विठोबा माळी, उपाध्यक्ष निंबाजी माळी, योगराज माळी, धनराज महाजन, व्ही.टी. माळी, विजय महाजन, रामचंद्र माळी, गोपाल बाविस्कर, सुरेश महाजन, गोपाल बाविस्कर, कैलास वाघ, प्रभुदास जाधव, गोपाल माळी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.