निलेश चौधरी यांना मताधिक्य देऊन विकासाला साथ द्या : गुलाबराव वाघ

cacfc9bf ee2c 4b9f 9d4c 150308d14bbc

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील नगरसेवक वासुदेव चौधरी व आराधना पाटील यांनी प्रभागात केलेली विकासकामे भविष्यातही अविरत सुरू ठेवण्यासाठी सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या शिवसेना-कॉंग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांना मताधिक्य देऊन विकासाला साथ द्यावी, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले आहे. ते धरणगाव शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील प्रचार रॅलीत दि.२४ (मंगळवार) रोजी मतदारांशी संवाद साधत होते.

 

शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात शिवसेना- काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांची प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी पदाधिकारी व शिवसैनिकांनी पायी फिरून परिसर पिंजून काढला. दरम्यान, यावेळी प्रभागातील नागरिकांनी शिवसेनेच्या रॅलीचे जोरदार स्वागत केले. ही रॅली मलकअली, गुजराती गल्लीपासून सुरुवात करण्यात आली. तर ही प्रचार रॅली महावीर चौक, जैन गल्ली, भाटिया गल्ली, कदर गल्ली, लांडगे गल्ली, परिहार चौक, गुजराथी गल्ली, मातोश्री कॉम्प्लेक्समार्गे कोट बाजार या ठिकाणी समाप्त झाली. या रॅलीत मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी माजी नगराध्यक्षा पी.एम.पाटील. उषाताई वाघ, प्रभारी नगराध्यक्ष अंजली विसावे, गटनेते पप्पू भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, आराधना पाटील, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, चंदन पाटील, कॉंग्रेसचे शहर प्रमुख राजेंद्र महाजन, युवासेना शहर प्रमुख संतोष महाजन, नगरसेवक विलास महाजन, अजय चव्हाण, रवींद्र जाधव, बुट्या पाटील, छोटू जाधव, चेतन जाधव, किरण अग्निहोत्री, कमलेश बोरसे, यतीन भाटिया, विजय चौधरी, नागराज पाटील, विनोद रोकडे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content