अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील तिरंगा चौकात शेतमजूरी करणारी महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची घटना गुरूवारी २० जुलै रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. शहरातील सुज्ञ नागरीक व महिलांनी वेळीच धाव घेवून बाळ व महिलेला तातडीने रूग्णवाहिकेतून अमळनेर ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. यावेळी मातेसह बाळाची प्रकृती चांगली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील तिरंगा चौकातील महाजन रेस्टारंट समोर एक महिला तिच्या पतीसह रस्त्यावरच वास्तव्याला आहे. मिळेल तरी मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवारी २० जुलै रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास महिलेची प्रसूती झाली. रक्तबंबाळ स्थितीत ती पडलेली असताना काय करावे हे तिच्या पतीला सुचत नव्हते. त्यावेळी महाजन रेस्टॉरंटचे मालक भाऊसाहेब महाजन यांनी रिक्षा बोलावली, पैसे ही देऊ केले. मात्र रक्ताने रिक्षा भरेल म्हणून कोणीही रिक्षा थांबविली नाही. महाजन यांनी 108 ला कॉल केला, तोपर्यंत बघ्यांची गर्दी झाली. मात्र कोणीही मदत करत नव्हते, अश्यावेळी एका अनोळखी महिलेने पुढे येते मदत केली. तर बापू आप्पा बिऱ्हाडे, किरन बागुल, यांनी चादर आणली त्यात नवजात बालकाला गुंडाळले. तोपर्यंत 108 आली, त्या महिलेच्या पतीला दवाखान्यात जायला सांगितले तेंव्हा त्याने पैसे नसल्याचे सांगितले. भाऊसाहेब महाजन यांनी स्वतः शंभर रुपये मदत करताच उपस्थितांनी कुणी पन्नास तर कुणी १० तर २० रुपये मदत केली. ते सर्व पैसे नवजात बाळ आणि मातेला देत त्यांना अमळनेर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. आता मातेसह बाळाची प्रकृती चांगली आहे.