ऐतिहासीक क्षण : कोरोना लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पूर्ण

नवी दिल्ली | भारतात कोरोना लसीकरणाने आज १०० कोटींचा टप्पा पार केला असून ही कामगिरी ऐतिहासीक मानली जात आहे.

 

भारताने आज लसीकरणाच्या १०० कोटींचा आकडा पार केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. यानिमित्त आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया हे ऐतिहासिक लसीकरणावरील गाणे आणि चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. याशिवाय देशातील विविध शहरांमध्ये भाजपचे मोठे नेते कार्यक्रमांचे आयोजन देखील करणार आहेत. भारत सरकारच्या कोविन पोर्टलच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत १०० कोटी डोस देण्यात आले आहेत. यात ७५% सर्व प्रौढांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. १०० कोटी डोसचे लक्ष्य पूर्ण केल्याबद्दल देशामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. देशभरात १०० स्मारके तिरंग्याने प्रकाशित करण्याची देखील योजना आहे. लाल किल्ल्यावर २२५ फूट लांब तिरंगा फडकवला जाईल. त्याचे वजन सुमारे १४०० किलो आहे. अ

Protected Content