मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नांदेड जिल्ह्यातील निवघा येथील कासार समाजातील अल्पवयीन मुलीची छेडखानी करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी क्षत्रिय सोमवंशीय कासार समाज मंडळातर्फे निवेदन देवून आरोपींवर पोक्सो कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार आणि पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.
ही विद्यार्थीनी बारड येथे इयत्ता ११ वीत शिक्षण घेत होती. मात्र, छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरातील रोड रोमीओंच्या अनेक विद्यार्थींनींना त्रास होता. याच त्रासाला कंटाळून गरीब कुटुंबातील या विद्यार्थींनीने १४ जुलै रोजी विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. यामुळे या विध्यार्थीनी ला आत्महत्येस कारणीभूत असलेल्या रोड रोमिओं विरुद्ध पोस्को कायद्या नुसार कठोर कारवाई करण्यात यावी . आणि सरकार मार्फत विशेष सरकारी वकील नेमून हा खटला फास्ट ट्रैक न्यायालयात चालवून या गरीब कुटुंबियांना न्याय देण्यात यावा. जेणे करून इतर विद्यार्थींनीना दिलासा मिळेल.
यावेळी बोलतांना मुक्ताईनगर कासार समाजाच्या वतीने बोलण्यात आले की निवघा ता. मुदखेड जि. नांदेड येथील आरोपीवर पोस्को अंतर्गत कारवाई केल्या शिवाय समस्त कासार समाज स्वस्थ बसणार नाही. येत्या काळात आंदोलन अधिक तिव्र करण्यात येईल तसेच यावेळी बोलतांना मुक्ताईनगर तालुक्यातील कासार समाजाचे श्री अनिल कासार म्हणाले की , एका अल्पवयीन महाविालयीन विद्यार्थीनीस महाविद्यालयात येता जाता त्रास देणारा गांवगुड ज्ञानेश्वर ऊर्फ सोन्या पवार याच्या सततच्या छळाला कंटाळून शेवटी तिला जीव गमवावा लागला. या महाविद्यालयात येणाऱ्या केवळ या पिडीत विद्यार्थीनीला च त्रास नव्हता तर या गावातील अनेक विदयार्थीनींना देखील त्रास आहे .बऱ्याच विद्यार्थिनीला त्यांचे पालक शाळेत सोडायला व घ्यायला येत असत. या गावगुंडामुळे या गावात विद्यार्थिनीच्या मनामध्ये भितीचे वातावरण पसरले असून यामुळे विद्यार्थीनींना महाविद्यालयीन शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. तर अशा आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी व त्यांच्या मालमत्तेवर बुलडोजर चालवावे म्हणजे त्यांना कायमची अददल घडेल आणि अशा गुंड प्रवृत्ती पुन्हा जन्माला येणार नाहीत व अश्या घटना पुन्हा होणार नाहीत व पुढील अश्या एखादं मुलीचा बळी जाणार नाही जेणे करून इतर विद्यार्थींनीना दिलासा मिळेल.
यावेळी जळगाव सो. क्ष.कासार समाजाचे जिल्हा सदस्य रमेश भिकाजीं मैंद, जिल्हा सदस्य अमोल वैद्य, जिल्हा सदस्य नितीन कासार तसेच ,मुकुंदा राजाराम लोखंडे, सचिन लोखंडे, सागर लोखंडे,दीपक लोखंडे, मोहन तांबट, मंगेश तांबट, सुमित धाबे, रुपेश माहूरकर, पंकज धाबे, तन्मय कासार, डॉ महेंद्र कानडे, सुभाष कानडे, विजय कानडे, राजेंद्र सातपुते, किशोर पांढरकर, सतीश सातपुते, रत्नाकर लोखंडे, सुधाकर लोखंडे, बाळू लोखंडे, मनोज कासार, उदय कासार, लोकेश लोखंडे, ,दीपक लोखंडे ,किशोर लोखंडे ,राकेश कासार ,आदी कासार समाज बांधव यांची उपस्थिती होती
मुक्ताईनगर तालुका कासार समाजातर्फे निवेदन देतेवेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी असे बोलले की, मी येत्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करून त्या ताईला योग्य तो न्याय शासनाकडून मिळावा व त्या रोड रोमिओला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करेल जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा मुद्दा लावून धरेल.