Home क्राईम धावत्या रेल्वेतून उतरताना जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

धावत्या रेल्वेतून उतरताना जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

1558757916
1558757916

1558757916

जळगाव प्रतिनिधी | जळगाव रेल्वे स्थानकावर न थांबणाऱ्या भागलपूर एक्स्प्रेसमधून जळगाव स्टेशनला उतरण्याच्या प्रयत्नात एका तरुणाने आपला जीव गमावल्याची घटना आज (दि.११) दुपारी ४.०० वाजेच्या सुमारास घडली.

 

याबाबत माहिती अशी की, फैजल बेग कमर बेग (वय २०) रा. गेंदालाल मिल हा आई-वडिलांसह नाशिकला मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमासाठी गेला होता. नाशिकहून तो दुपारी १२.०० वाजेच्या सुमारास भागलपुर एक्सप्रेसने जळगावला येत होता. दरम्यान ही रेल्वे जळगाव स्थानकावर थांबत नसल्याचे पाहून फैजल बेग याने उतरण्याचा प्रयत्न केला असता त्याचा पाय अडकून तो गंभीर जखमी झाला. तातडीने इतर तरुणांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याचे पाहून तरुणांनी खाजगी रुग्णालयात रवाना केले. तेथे सायंकाळी ६.०० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


Protected Content

Play sound