अमळनेर – गजानन पाटील । राज्यात काही ठिकाणी पावसाने चांगलाच जोर धरला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. याउलट खान्देशात मात्र, वरूण राजाची वक्रदृष्टी दिसून येत आहे. जून उलटून जुलै महिना उजळला तरी बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस सक्रिय झाला नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. एकीकडे जुलै महिना उजळला म्हणून लांबलेला पाऊस जोमाने येईल या आशेने अमळनेर तालुक्यात अनेकांनी धूळ पेरणी करून ठेवली.तर काही शेतकरी बांधवांची पुरेसा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत.गेल्या दोन तीन दिवसापूर्वी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली खरी; मात्र ती समाधानकारक नाही असे बरेच शेतकऱ्यांचा अनुभवावरून सांगितले जाते आहे.
दरम्यान,राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असला तरी तोएकाच वेळी सर्वत्र पडेल असे दिसत नाही. दोन दिवसांपासून पुन्हा उकाड्याने जनसामान्य त्रस्त झाले आहेत.ठीक ठिकाणी कोरड मध्ये केलेली कापूस लागवड ने आता अल्पशा पावसात कोंब काढले आहेत परंतु पावसाअभावी ते कोमेजून जाण्याची शक्यता नाकारता येतनाही.
राज्यात मान्सून अद्याप पाहिजे तसा सक्रिय झालेला नाही,जिल्ह्यात व अमळनेर तालुक्यात काही दिवसापासून हलक्या, मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असला तरी तो सलग पडताना दिसत नाहीय. दरम्यान तालुक्यातील बहुतेक भागात अद्यापही पेरणी योग्य पाऊस नसल्याने अनेक शेतकरी बांधवांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.तर उगवण झालेले पीक वाया जाते की काय जी देखील चिंता सतावताना दिसत आहे.ओढ दिलेला पाऊस पुन्हा सक्रिय होईल यावर आता सगळ्यांचा नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.