Home Cities जळगाव प.वि.पाटील विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

प.वि.पाटील विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरु या गुरूंच्या महतीसाठी आज गुरुपौर्णिमेनिमित्त केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

 

सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक तसेच शालेय शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांच्या हस्ते गुरु व्यास ऋषीच्या प्रतिमेची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी गुरु शिष्यांची भूमिका साकारून त्याप्रमाणे वेशभूषा करून सुंदर अशा नाटकांचे सादरीकरण केले तर काही विद्यार्थ्यांनी यावेळी गुरु शिष्यांच्या कथा सांगितल्या.  कार्यक्रमाचे आयोजन स्वाती पाटील यांनी केले तर उपशिक्षक योगेश भालेराव, कायनात सय्यद तसेच मंगल गोठवाल यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.


Protected Content

Play sound