यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील विरावली येथील अटल भूजल योजनेच्या अंतर्गत सुरू असलेले काम अंतीम टप्प्यात आले आहे.
तालुक्यातील विरावली गावात माजी सरपंच पालकमंत्री यांचे निकटवर्ती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुषार सांडूसिंग पाटील (मुन्नाभाऊ ) यांनी सर्व शिंदे गटाचे मान्यवरांकडुन मिळालेल्या सातत्यपुर्ण पाठपुराव्याने अटल भुजल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांना वेग आला असुन सर्व कामे ही अंतीम टप्प्यात पहोचले आहे .
तुषार (मुन्ना ) पाटील यांच्या सोबतीला विरावली गावच्या प्रथम नागरिक सरपंच कलीमा तडवी व ग्रामपंचायत उपसरपंच सौ मनीषा ईश्वर पाटील याचे मार्गदर्शनखाली काम चालू आहे. संपुर्ण कामे ही गावातील ग्रामस्थांच्या सहभागा करण्यात येत आहे. सभापती तुषार पाटील व सरपंच कलीमा तडवी यांच्या पाठपुराव्याने अटल भूजल योजने अंतर्गत चालू वषॉचा रिवाईज डब्ल्यूएसपी करणे करीता गावात ग्रामसभा घेवून रिचार्ज शाफ्ट व ट्रेच नाला खोलीकरण करणे करिता आहोरात्र झटून काम करत आहे.
या कामास अंतीम रूप देण्यासाठी ईश्वर पाटील, हमीद तडवी, नथू अडकमोल, कैलास उखा पाटील, राजेंद्र भास्कर पाटील, मेहबूब बलदार तडवी, रवींद्र दिगंबर पाटील, भागवत भीमसिंग पाटील, सुभान रमजान तडवी, मुकुंदा भालेराव, गफार तडवी, प्रवीण ठाणसिंग पाटील, सुपडू तडवी यांच्यासह ग्रामसेवक छाया पाटील आदींचे व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे.