जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे गोमांस विक्री करणाऱ्या दोन जणांवर शुक्रवार, ३० जून रोजी दुपारी १ वाजता नशिराबाद पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी दोघाही जणांविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नशिराबाद गावात एका सिमेंटच्या पक्के घराच्या खालच्या मजल्यात खोलीत दोन तरुण हे शासनाने बंदी घातलेल्या गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल करून मास विक्री करत असल्याची माहिती नशिराबाद पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जाऊन छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दहा किलो गोमांस व इतर साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक हेमंत प्रकाश मिटकरी यांच्या फिर्यादीवरून गोमांस विक्री करणाऱ्या समील शहा खलील शहा वय 32 रा.काजीपुरा नशिराबाद, व शेख मेहबूब शेख गुलजार वय 41 राहणार फुकटपुरा नशिराबाद या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल युनुस शेख हे करीत आहेत.