क्राईम, भुसावळ

भुसावळात विद्यार्थ्यास चाकूने भोसकले

शेअर करा !

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील नाहाटा चौफुलीजवळ एका विद्यार्थ्याला चाकूने भोसकल्याची घटना आज दुपारी घडल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, शहरातील नाहाटा चौफुलीजवळ आज दुपारी दोनच्या सुमारास एका विद्यार्थ्यावर चाकू हल्ला झाला असून यात तो विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमी विद्यार्थ्याला रूग्णालयात दाखल केले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी विद्यार्थ्याचे नाव निलेश गोविंदा पवार (वय१९) असल्याचे कळते. दरम्यान, त्याच्यावर नेमका कुणी व कशासाठी हल्ला केला याची माहिती मात्र मिळू शकली नाही. तर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत. भर दिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

(सविस्तर माहिती लवकरच)

आपल्याला हे देखील आवडू शकते !


शेअर करा !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*