जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरातील रेमंड कंपनीच्या गेटसमोरून एका तरूणाची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जितेंद्र एकनाथ चौधरी (वय-३०) रा. ज्ञानदेव नगर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एमआयडीसी परिसरातीत रेमंड कंपनीत कामाला आहे. गुरूवारी २९ जून रोजी जितेंद्र हा कंपनीत कामावर दुचाकी (एमएच १९ बीटी ८३०२) ने गेला. सकाळी ७ वाजता दुचाकी कंपनीच्या गेटसमोर असलेल्या पार्किंग झोन मध्ये दुचाकी पार्क करून लावली व कामावर निघून गेला. त्यानंतर दुपारी ३ वाजता घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ आला असता त्याला दुचाकी जागेवर दिसून आली नाही. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर शुक्रवारी ३० जून रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.