Home क्राईम दुकानदाराची सोन्याची अंगठी व रोकड लांबविली

दुकानदाराची सोन्याची अंगठी व रोकड लांबविली

0
34


चाळीसगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील नगरपालिका कॉम्प्लेक्स मधील शिवछाया इलेक्ट्रॉनिक दुकानासमोरून एकाच्या हातातील सोन्याची अंगठी व रोकडाचा एकूण ३६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 

पोलीस वतन कडून मिळालेली माहिती अशी की महेश शिवाजी देशमुख (वय-४७, रा. पवारवाडी विठ्ठल मंदिराजवळ, चाळीसगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान चाळीसगाव शहरातील नगरपालिका कॉम्प्लेक्समधील शिवशाही इलेक्ट्रॉनिक दुकान त्यांचे आहे. २८ जून रोजी दुपारी १२ वाजता ते दुकानावर असताना संशयित आरोपी भोगाभाई छगन सलाट (वय-४७, रा.पिंकानगर, वडोदा रा. गुजरात) हा तिथं आला. त्याने महेश देशमुख यांचे मालकीचे ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याची अंगठी आणि दीड हजार रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार घडल्यानंतर महेश देशमुख यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी भोगाभाई छगन सलाट यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound