Home धर्म-समाज भडगाव तालुक्यातील जवान हुतात्मा : शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

भडगाव तालुक्यातील जवान हुतात्मा : शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

0
63


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील गुढे येथील राहूल श्रावण माळी या जवानाला सीमेवर झालेल्या चकमकीत वीरगती प्राप्त झाली असून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भडगाव तालुक्यातील गुढे येथील राहूल श्रावण माळी ( वय ३४) हे सैन्यदलात कार्यरत असून त्यांची पश्‍चिम बंगालमधील कंचनपुरा येथे पोस्टींग होती. येथे झालेल्या चकमकीत त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. ही वार्ता परिसरात पसरताच संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, बराकपूर येथे त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव गुढे येथे आणण्यात येणार असून येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आराहूल श्रावण माळी हे १४ वर्षांपूर्वी सैन्यदलात दाखल झाले होते. देशासाठी त्यांनी प्राण अर्पण केल्याने या कुटुंबावर वज्राघात झाला आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले. आई-वडील, दोन भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.


Protected Content

Play sound