अवैधरित्या गौणखनिजाची वाहतुक करणाऱ्या विनानंबर वाहनांवर आरटीओ मार्फत कारवाई

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अवैधरित्या गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या विनानंबर वाहनांवर आटीओ मार्फत कारवाई करण्यात येईल , शिवाय दर दोन महिन्यांनी तालुकानिहाय आढावा बैठक देखील घेण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पाचोरा येथे आढावा बैठकीत दिली.

 

जिल्हाधिकारी अमन मित्तल  “शासन आपल्या दारी” या योजनेच्या जळगांव येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ना. गिरीष महाजन, यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमानंतर प्रथमच आज २८ जुन रोजी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन “शासन आपल्या दारी” या योजने अंतर्गत प्रसार माध्यमांनी माहिती दिली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे, तहसिलदार प्रविण चव्हाणके, प्रशिक्षणार्थी आय. ए. एस. अरप्रित चव्हाण उपस्थित होते.

 

यावेळी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीने तात्काळ विविध विकास कामांचा आढावा तयार करून तो शासनासह जिल्हा अधिकारी कार्यालयात पाठवावा, नुतन मतदान यादी प्रसिद्ध करावयाची असल्याने संबंधित विभागातील बी. एल. ओ. यांनी १८ वर्षांवरील मतदारांचे फार्म भरुन मतदार याद्या तयार कराव्यात, सद्यस्थितीत शेतकरी खरीप हंगामाच्या पेरण्या करीत असल्याने ज्या ठिकाणी बोगस रासायनिक खते व बियाणे विक्री होत असेल त्याची माहिती हेल्पलाईन नंबर ९२०९२८४०१० वर कळवावी जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाणार नाही. याशिवाय ज्या ठिकाणी गौण खनिज उत्खनन अवैध वाळू उपसा होत असेल त्याच फोटो अथवा व्हिडिओ पाठवा, बिना परवानगी वाळू वाहतूक होत असेल अथवा विना नंबर वाहनाने वाहतूक केली जात असेल तर अशा वाहनांवर आर. टी. ओ. मार्फत कारवाई करण्यात येईल. याशिवाय मी दर दोन महिन्यांनी तालुकानिहाय आढावा बैठक घेणार असल्याचे सांगितले. यावेळी पाचोरा शहरासह तालुक्यातील प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Protected Content