पाचोरा शहरात नागरिकांची आरोग्य तपासणी

पाचोरा प्रतिनिधी । कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमिवर पाचोरा शहरात प्रभागनिहाय आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे.

पाचोरा येथे कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने प्रभागनिहाय तपासणीस प्रारंभ करण्यात आला आहे. यात सिंधी कॉलनी येथे पहिल्याच दिवशी ८५ तर २७ रोजी बसस्थानक परिसरातील शिवाजीनगर, भीम नगर, हनुमान नगर येथील ३० नागरिकांचे नमुने घेण्यात आले.
या वेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, पालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, नगरसेवक विष्णू अहिरे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अमित साळुंखे, निवासी नायब तहसीलदार अमित भोईटे यांची उपस्थिती होती. दरम्यान, पाचोरा शहरात सुरू असलेल्या लॉकडाऊनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.

Protected Content