दोन राज्यांच्या सिमेवरील शिवरस्ता अतिक्रमण काढल्याने झाला मोकळा

रावेल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मध्यप्रदेश -महाराष्ट्र सिमेवर गेल्या अनेक वर्षांपासूनचा तक्रारग्रस्त शिवरस्ता रावेर तहसीलदार बंडू कापसे यांच्या प्रयत्नांमुळे मोकळा झाला. त्यांनी मध्यप्रदेश तहसीलदारांशी संपर्क साधुन दोन्ही तहसीलदार प्रत्यक्ष शिवरस्त्यावर उपस्थित राहून अतिक्रमन काढले व मोकळा केला. मोकळा केलेल्या रस्त्यामुळे सुमारे पन्नास शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

मध्यप्रदेश येथील (लोणी) तर महाराष्ट्रा मधील (चोरवड) सिमेवरील शिवरस्ता संदर्भात सुमारे ५० शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.मागील अनेक वर्षा पासून याबाबत शेतकरी तहसिलचे चकरा मारत होते. याची स्वता:तहसीलदार बंडू कापसे यांनी दखल घेत मध्यप्रदेश येथील बुरहानपुर तहसीलदार रामलाल पगारे यांच्याशी संपर्क साधुन दोन्ही तहसीलदार मध्यप्रदेश महाराष्ट्रा सिमेवर पोलिस यंत्रणासह उपस्थित झाले व दोन्ही बाजूने सुमारे पाच किमी अंतरावरील पंधराफूटा पर्यंतचा अतिक्रमन झालेला भाग काढून मोकळा केला.यावेळी मंडळ अधिकारी विठोबा पाटील यांनी हा शिवरस्ता मोकळा करण्यासाठी परिश्रम घेतले

 

शेतकऱ्‍यांनी रावेर तहसीलदारांचे मानले आभार

लोणी व चोरवड या दोनराज्याच्या सिमेवर हा शिवरस्ता असल्याने येथील शेतकरी ब-याच वेळा रावेर तहसील कार्यालयात चकरा मारत होते.तत्कालिन तहसिलदार याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत होते.परंतु याला विद्यमान तहसीलदार बंडू कापसे अपवाद आहे.त्यांनी या तक्रारीची दखल घेत दोन राज्यांच्या सिमेवरील रस्ता असल्याने मध्य प्रदेश तहसीलदार यांच्याशी संपर्क साधुन प्रत्यक्ष जाऊन मोकळा केला या बद्दल या परिसरातील शेतक-यांनी महाराष्ट्रा व मध्य प्रदेश शासनाचे आभार मानले.

Protected Content