सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून जातीवाचक शिवीगाळ

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका खासगी क्लासच्या शिक्षकाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रावेर तालुक्यातील सावदा शहरात समर्थ ॲकॅडमीचे शिक्षक दिपकराज पाटील याने रविवारी २५ जूर रोजी सायंकाळी ७ वाजता इंस्टाग्रामवर एका पक्षाच्या नेत्याच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली होती. दरम्यान, ही पोस्ट व्हायरल का केली असा जाब एकाने विचारला. यावर शिक्षकाने जातीवाचक शिवीगाळ करून जे करायचे ते करून घे अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर सावदा पोलीस ठाण्यात खासगी क्लास शिक्षकाविरोधात तक्रार देण्यात आली. त्यानुसार सावदा पोलीस ठाण्यात ॲस्ट्रासीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे करीत आहे.

Protected Content