Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा

मुक्ताईनगरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा

0
30

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यालय मुक्ताईनगर येथे तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील सर यांच्या हस्ते पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रोहिणी खडसे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी रोहिणी खडसे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी त्या म्हणाल्या गेले पंचविस वर्षा पासून महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत समर्पित भावनेने कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असल्याचे त्या म्हणाल्या. सत्ता असो अथवा नसो शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची घौडदौड सुरू असून आगामी काळात सुद्धा आपल्या सर्वांच्या मेहनतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सत्तेत येईल असा विश्वास रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार,शहराध्यक्ष राजेंद्र माळी,युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे,बाजार समिती सभापती सुधिर तराळ,प्रवक्ता सेल संयोजक विशाल महाराज खोले,निलेश पाटील, रामभाऊ पाटील,किशोर चौधरी,मधुकर गोसावी,रविंद्र दांडगे,प्रविण पाटील, बापु ससाणे, एजाज खान,बाळा भालशंकर,विकास पाटील,नंदकिशोर हिरोळे,रउफ खान,सुनिल पाटील,भावराव पाटील,सोनु पाटील, प्रविण दामोदरे, प्रदिप साळुंखे, संजय कपले,विशाल रोटे, राहुल पाटील, निलेश भालेराव, हाशम शहा, अय्याज पटेल, मुश्ताक मण्यार,जुबेर अली फिरोज सैय्यद ,वहाब खान, अख्तर मण्यार, हर्षल झोपे, प्रभाकर झोपे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound