चाळीसगाव । येथील शिंपी समाजाने आज चाळीसगाव तहसील कार्यालयावर एका मोर्चाद्वारे निवेदन सादर केले असून यात प्रणाली जाधव यांच्या हत्येची सीआयडी चैक्षी निवेदनात उंडणगाव तालुका सिल्लोड येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी प्रणाली कृष्णा जाधव हिने लिपिक संजय घोगरे याच्या सैतानी त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोप करून यासंबंधी अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणात निष्पाप प्रणाली जाधव हिला आपला प्राण द्यावा लागला असल्याने तिच्या मृत्यूच्या कारणीभूत असलेल्या संजय घोगरे या आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी व सदर घटनेचा तपास सीआयडीमार्फत करण्यात यावा या खटल्यात वरिष्ठ सरकारी वकील ॲडवोकेट उज्वल निकम यांची नेमणूक व्हावी तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या दामिनी पथकाची काम गतिमान करण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे यावेळी शिंपी समाजातील बहुसंख्य कार्यकर्ते हजर होते
प्रणाली जाधव हत्येची सीआयडी चौकशी करावी
6 years ago
No Comments