संतप्त प्रवाशांचा भुसावळ रेल्वे स्थानकावर राडा ( व्हिडीओ )

railway passengers

भुसावळ प्रतिनिधी । रेल्वेच्या डब्यातील एसी बंद असल्याच्या कारणाने भडकलेल्या प्रवाशांनी येथील रेल्वे स्थानकावर गोंधळ घातल्याची घटना आज घडली.

याबाबत वृत्त असे की, लोकमान्य टिळक टर्मिनस ते गुवाहाटी दरम्यान धावणार्‍या (१५६४६) एक्सप्रेस गाडीतील एसी कोचमध्ये वीज नसल्याच्या कारणामुळे वातानुकुलन करणारी यंत्रणा बंद होती. यामुळे बी२ आणि बी ३ हे या दोन्ही डब्यातील प्रवाशांना अडचण झाली. या संदर्भात प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकार्‍यांकडे तक्रार केली, याच्या जोडीला वरिष्ठांना ट्विटद्वारे माहितीदेखील देण्यात आली. तरीही याची कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. गेल्या सहा तासांपासून हा प्रकार सुरू होता. दरम्यान, दहा वाजेच्या सुमारास ही ट्रेन भुसावळ स्थानकावर आल्यानंतर प्रवाशांनी स्टेशनवरील अधिकार्‍यांना हा प्रकार सांगितला. तथापि, त्यांच्या समस्येचे निराकरण न झाल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी जोरदार घोषणाबाजी करून आपला रोष व्यक्त केला. सुमारे एक तासापर्यंत हा गोंधळ सुरू होता. या गाडीला सिग्नन दिल्यानंतर रेल्वे प्रवासी चेन खेचून गाडीला थांबवत होते. यामुळे ही गाडी उभी असणार्‍या फलाट क्रमांक सातवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या डब्यातील वीज पुरवठा सुरळीत करून एसी सुरू केल्यानंतर ही गाडी रवाना झाली.

पहा : प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रियांचा व्हिडीओ.

Add Comment

Protected Content