Home क्राईम हळदीच्या कार्यक्रमात एकावर ब्लेडने वार

हळदीच्या कार्यक्रमात एकावर ब्लेडने वार


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे हळदीच्या कार्यक्रमाला गेल्याच्या कारणावरून एका प्रौढ व्यक्तीला बेदम मारहाण करत ब्लेडने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात बुधवारी ३१ मे रोजी दुपारी १२ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रोहिदास हरचंद बेलदार (वय-५०, रा.गारखेडा बुद्रुक ता.जामनेर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. ३० मे रोजी रात्री ८ वाजता त्यांच्या गावातील विजय दशरथ बेलदार यांच्या भावाच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम होता. त्यामुळे रोहिदास बेलदार हे हळदीच्या कार्यक्रमात गेले होते. याचा राग आल्याने विजय दशरथ बेलदार याने रोहिदास बेलदार यांच्या अंगावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केले व काठीने मारहाण करून दुखापत केली. यानंतर रोहिदास बेलदार यांना जखमी अवस्थेत जामनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत रोहिदास बेलदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विजय दशरथ बेलदार (रा. गारखेडा ता. जामनेर) यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound