धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नांदेड फाटा परिसरातून बेकायदेशीर रित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर धरणगाव पोलिसांनी पकडले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील नांदेड फाटा येथे २९ मे रोजी सायंकाळी ६.३० ते ७ वाजेच्या दरम्यान बेकायदेशीर रित्या वाळूची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती धरणगाव महसूल विभागाचे मंडळ अधिकारी प्रवीण बेंडाळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकासह कारवाई केली. यावेळी ट्रॅक्टर चालक भटू रमेश सैंदाणे हा विना क्रमांकाचे ट्रॅक्टरमधून एक ब्रास वाळू घेऊन जात असताना आढळून आला. वाळू वाहतकीबाबत त्याच्याकडे परवाना आहे की नाही याची तपासणी केली असता त्याबद्दल त्याच्याकडे कुठलीही माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यानुसार ट्रॅक्टर महसूल पथकाने जमा केले असून मंडळाधिकारी प्रवीण मधुकर भेंडाळे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक भटू रमेश सैंदाणे याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक चंद्राला सोनवणे करीत आहे.