वेशभूषा व पोषाख बघून हल्ला करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात व जिल्ह्यात मागील सात दिवसात  एका विशिष्ट जाती-जमातीच्या वेष भूषा, पोशाखावरून व दाढीवरून काही समाजकंटक त्यांना मारहाण करीत आहे. वेळीच अशा समाजकंटकांवर पोलिसांनी त्वरित कारवाई करावी  अशी मागणी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना अल्पसंख्यांक समाजाच्या शिष्टमंडळाने  केली आहे.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दाढी, टोपी व पोशाख बघून हल्ला करणारे  समाज कंटक हे पाच ते दहा संख्येत असतात परंतु पोलीस तक्रार घेताना फक्त तीन ते चार व्यक्तींची नोंद घेत घेऊन अदखलपात्र गुन्हा नोंदवीत असल्याने संबंधित समाजकंटक यांच्यावर त्याचा काही एक परिणाम होत नाही म्हणून त्या समाजकंटकांवर  गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

 

यावेळी जळगाव जिल्हा मनीयार बिरादरीचे फारुक शेख, प्रतिभा शिरसाठ, सैयद चांद, संजय पाटील, सत्यनारायण पवार,  मजहर पठाण, फिरोज शेख, अन्वर खान व मुजाहिद खान, सय्यद मोहसीन, ताहेर शेख,  इम्तियाज शेख,  मोहसिन युसुफ, वसीम बापू व शाहरुख बागवान, मतीन पटेल, आसिफ शेख,जुबेर शेख सुलतान आदींची उपस्थिती होती.

Protected Content